अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याचा दोनदा लैंगिक अत्याचार; पोलीस त्याला पकडायला गेले तेव्हा दिसले धक्कादायक दृश्य!!
मुंबई : १७ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने दोनदा लैंगिक अत्याचार केला. पीडिता पोलिसांत तक्रार करायला गेल्याचे कळल्यानंतर या शेजाऱ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. विरार येथील तुळीज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने तिला एकटे पाहून घरात ओढले. बळजबरी तिच्यावर दोनदा लैंगिक अत्याचार केला. पीडितेने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठून शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्यांना तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले. कारवाई व बदनामीच्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.