अनैतिक संबंध सुरू असताना भिक्षुक महिलेने दरवाजा वाजवून केले डिस्टर्ब; जीव गमवावा लागला…

सातारा : प्रियकर आणि प्रेयसीचे अनैतिक संबंध सुरू असताना ७० वर्षीय भिक्षुक महिलेने दरवाजा वाजवला. त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. कामात अडथळा आल्याने त्यांनी रागाच्या भरात भिक्षुक महिलेचा खून केला. १२ सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील येलमरवाडी (ता. खटाव) येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगीता गणपत देशमुख, तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. …
 

सातारा : प्रियकर आणि प्रेयसीचे अनैतिक संबंध सुरू असताना ७० वर्षीय भिक्षुक महिलेने दरवाजा वाजवला. त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. कामात अडथळा आल्याने त्यांनी रागाच्या भरात भिक्षुक महिलेचा खून केला. १२ सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील येलमरवाडी (ता. खटाव) येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगीता गणपत देशमुख, तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. येलमरवाडी) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

गौतम कृष्णा नलावडे (रा. येलमरवाडी) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. नलावडे यांची मावशी हिराबाई गावात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होत्या. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बागल आणि त्याची प्रेयसी संगीता यांच्यात अनैतिक शरीरसंबंध सुरू होते. त्याच वेळी हिराबाईंनी भिक्षा मागण्यासाठी वारंवार दरवाजा ठोठावला. संबंधात व्यत्यय आल्याने त्यांनी रागाच्या भरात हिराबाईंच्या डोक्यात दंडुक्याच्या प्रहार केला. यामुळे हिराबाईंचा मृत्यू झाला, अशी कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपी बागल याने दिली आहे.

पोलिसांनी असा लावला गुन्हेगारांचा छडा
१२ सप्टेंबरच्या रात्री हिराबाई गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर मृतावस्थेत पडलेल्या लोकांना दिसल्या. नागरिकांनी ही माहिती वडूज पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हिराबाई गावात भिक्षा मागत असल्याने त्यांचे कुणासोबत शत्रुत्व असण्याची शक्यता खूप कमी होती. त्यामुळे खुनाची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांचे पथक गावात तळ ठोकून वेगवेगळ्या शक्यता तपासत नागरिकांची चौकशी करत होते. त्यादरम्यान खरा खुनी बागल हा अंधारात बसून पोलिसांच्या तपासाची माहिती ऐकत होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून बागलला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची प्रेयसी संगीतालाही अटक केली.