घरमालकिनीच्या मुलीवर भाडेकरू युवकाची वाईट नजर! एकटे पाहून अश्लील चाळे
Jan 21, 2022, 09:16 IST
पुणे : घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर भाडेकरू युवकाची वाईट नजर पडली. एकटी पाहून युवकाने तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. मुलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार समोर आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 30 वर्षीय युवकाविरुद्ध पुण्याच्या चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली भागातील मोरे वस्तीत १७ जानेवारीला रात्री १० ला ही घटना घडली.
अविनाश वाघमारे (३०, साने चौक, मोरेवस्ती, पुणे) असे संशयित युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मोरे वस्तीत अविनाश भाड्याने राहतो. १७ जानेवारीच्या रात्री १० ला तो घरमालकाकडे आला. त्याने तंबाखूला लावायला चुना मागितला.
घरमालकाची१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेडवर बसून टीव्ही पाहत होती. त्याने तिला चुना घेऊन बाहेर बोलावले व अंधारात तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. तिने आरडाओरड केल्यावर मुलीची आई धावत आली. तिच्या आईने तिला जाब विचारला असता 'तुमच्या मुलीला उचलून घेऊन जाईल' अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.