State News : विवाहित असल्याचे लपवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार!; प्रियकरासह गर्भपात करणारा डॉक्टरही अडकला!!

पुणे : त्याचे आधीच लग्न झालेले असतानाही त्याने २५ वर्षीय तरुणीपासून ही बाब लपवली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर एका डॉक्टरकडून गर्भपात करवून घेतला. याप्रकरणाची तक्रार पीडित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून फसवणूक करणारा तथाकथित प्रियकर आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष शैलेश …
 

पुणे : त्याचे आधीच लग्न झालेले असतानाही त्याने २५ वर्षीय तरुणीपासून ही बाब लपवली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर एका डॉक्टरकडून गर्भपात करवून घेतला. याप्रकरणाची तक्रार पीडित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून फसवणूक करणारा तथाकथित प्रियकर आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आशिष शैलेश सपकाळ (३४, रा. लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार (धन्वंतरी हॉस्पिटल, धानोरी) अशी संशयित आरोपींची नावे आहे. आशिष सपकाळ आणि २५ वर्षीय तरुणी आपसातील ओळखीचे होते. आशिषने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. “त्या’ क्षणांचे व्हिडिओ चित्रिकरण व फोटोही काढून ठेवले. लोणावळा, भेकराईनगर, वडकी येथील लॉजवर तरुणीला नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर डॉ. खैरनार याने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करवला. तिने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याचे अगोदर लग्न झाल्याचे तिला कळले. त्याने त्या संबंधाचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.