STATE NEWS : “मला तुझ्यासाठी खास देवाने पाठवलंय’ म्‍हणत पुजाऱ्याचा ६ वर्षे विवाहितेवर लैंगिक अत्‍याचार!

नांदेड : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुजाऱ्याने ४० वर्षीय विवाहितेवर सतत ६ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच नांदेडमध्ये समोर आली आहे. तिच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी श्रीपाद देशपांडे नावाच्या पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो नांदेड शहरातील गोपाळ चावडी भागातील एका देवीचा पुजारी आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ६ वर्षांपूर्वी पुजारी तिच्या घरी आला होता. …
 

नांदेड : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुजाऱ्याने ४० वर्षीय विवाहितेवर सतत ६ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच नांदेडमध्ये समोर आली आहे. तिच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी श्रीपाद देशपांडे नावाच्या पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो नांदेड शहरातील गोपाळ चावडी भागातील एका देवीचा पुजारी आहे.

महिलेच्‍या तक्रारीनुसार, ६ वर्षांपूर्वी पुजारी तिच्या घरी आला होता. तेव्हा ती अंघोळ करत होती. त्याने लपून छपून महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करून बदनामी करेल, अशी धमकी दिली. तिच्याशी बळजबरी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो सतत अत्याचार करू लागला. पीडितेने विरोध केला असता, “मी महाराज आहे. मला तुझ्यासाठी खास देवानं पाठवलं आहे. मी जसं म्हणेल तसं तू वागलं पाहिजे’, असं तथाकथित पुजारी म्हणायचा. या संबंधातून विवाहिता गर्भवती राहिली. तेव्हा लाथा मारून पुजाऱ्याने तिच्या पोटातील गर्भ मारून टाकला, असे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पुजाऱ्याने पीडितेच्या २० वर्षीय तरुणीवरसुद्धा अतिप्रसंग केला. पुजाऱ्याचा उपद्रव वाढल्याने महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.