State News : नग्‍न फोटो पतीला दाखविण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्‍याचार!

यवतमाळ : गुंगीचे औषध पाजून ३३ वर्षीय विवाहितेचे नग्न फोटो काढले. ते फोटो तिच्या पतीला दाखविण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरातील अवधूतवाडी भागात समोर आला आहे. अवधूतवाडी पोलिसांनी विशाल शेंडे या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेसोबत २०११ मध्ये विशालची ओळख झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने …
 

यवतमाळ : गुंगीचे औषध पाजून ३३ वर्षीय विवाहितेचे नग्न फोटो काढले. ते फोटो तिच्या पतीला दाखविण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरातील अवधूतवाडी भागात समोर आला आहे.

अवधूतवाडी पोलिसांनी विशाल शेंडे या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेसोबत २०११ मध्ये विशालची ओळख झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्‍याने तिला घरी बोलावले. तिला चहात गुंगीचे औषध पाजले. ती बेशुद्ध झाली. नंतर त्‍याने तिचे नग्न फोटो काढले. एके दिवशी विशालने तिला फोन केला. घरी भेटायला ये, असे सांगितले. तिने कशासाठी असे विचारले असता त्‍याने तिला तुझे नग्न फोटो माझ्याकडे आहेत. आली नाहीस तर तुझ्या पतीला फोटो दाखवतो, अशी धमकी दिली. त्‍यामुळे विवाहिता घाबरून गेली.

तिने लगेच विशालचे घर गाठले. यावेळी विशालने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तिने विशालचा मोबाइल तपासला असता फोटो २०१३ मध्ये गुंगीचे औषध पाजून काढल्याचा अंदाज तिला आला. तेव्हापासून २०२० पर्यंत विशाल वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जात अत्‍याचार करत राहिला. रविवारी पीडितेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. विशालविरुद्ध तक्रार दिली. तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.