State News : एकतर्फी प्रेमातून फाडला महिलेचा गाऊन!; ३० वर्षीय महिलेची तक्रार

पुणे : एकतर्फी प्रेमामुळे विकृत मंडळी काय करेल काहीच सांगता येत नाही. आता पुण्यातलाच प्रकार पहा ना… एका माथेफिरू युवकाने ३० वर्षीय महिलेचे सर्वांसमाेर कपडे फाडले. तिच्या तक्रारीवरून ३४ वर्षीय युवकाविरुद्ध पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, हा युवक सतत तिचा पाठलाग करायचा. दारूच्या नशेत असलेल्या या युवकाने तिच्याकडे …
 

पुणे : एकतर्फी प्रेमामुळे विकृत मंडळी काय करेल काहीच सांगता येत नाही. आता पुण्यातलाच प्रकार पहा ना… एका माथेफिरू युवकाने ३० वर्षीय महिलेचे सर्वांसमाेर कपडे फाडले. तिच्‍या तक्रारीवरून ३४ वर्षीय युवकाविरुद्ध पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, हा युवक सतत तिचा पाठलाग करायचा. दारूच्या नशेत असलेल्या या युवकाने तिच्‍याकडे लग्नाची मागणी केली. त्यावेळी महिलेने कोण तू? आपला संबंध काय? असे म्हटले असता त्याने तिला अश्लील शिविगाळ केली. तू मला शिव्या का देतो असे महिलेने म्हटले असता त्‍याने सर्वांसमोर तिच्या अंगावरील गाऊन फाडला, असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.