State News : अंधश्रद्धेचा खेळ… पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वाघाच्या बछड्याची केली हत्या!

नागपूर : आभाळातून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दोन युवकांनी वाघाच्या १० दिवसांच्या बछड्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघाच्या बछड्याला पकडून घरी नेले. नंतर घराजवळ त्याची हत्या करण्यात आली. अंधश्रद्धेतून केलेल्या या अघोरी पूजेनंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही. मात्र वाघाच्या बछड्याची हत्या करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागत आहे. वन विभागाच्या तपासात हा धक्कादायक …
 

नागपूर : आभाळातून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दोन युवकांनी वाघाच्या १० दिवसांच्या बछड्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघाच्या बछड्याला पकडून घरी नेले. नंतर घराजवळ त्याची हत्या करण्यात आली. अंधश्रद्धेतून केलेल्या या अघोरी पूजेनंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही. मात्र वाघाच्या बछड्याची हत्या करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागत आहे. वन विभागाच्या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मेळघाट क्षेत्रातील एका बछड्याची पाच महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. लोमेश आणि कालिदास अशी आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोमेशचे वडील अघोरी पूजा करत असतात. अंधश्रद्धेतून ते अनेक प्रकारची पूजा करत असतात. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लोमेश आणि त्याचा मित्र कालिदास यांनी वाघाच्या बछड्याची हत्या केली. त्यानंतर त्यांचे शव पुढे ठेवून एकांतात अघोरी पूजा केली. मात्र पैशाचा पाऊस न पडल्याने बछड्याचे शव विक्री करण्याची योजना त्यांनी आखली. वनविभागाला ही माहिती मिळताच सापळा रचून त्‍यांना अटक करण्यात आली.