STATE NEWS खळबळजनक! चिखलीत भर चौकात हत्याकांड; तरुणावर गोळ्या झाडल्या; कांड करून आरोपी फरार
May 22, 2023, 21:22 IST
चिखली(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. भर दिवसा हत्याकांड करायला सुद्धा गुन्हेगार मागे पुढे पाहत नाही अशी स्थिती आहे. आज,२२ मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या चिखली पोलीस ठाण्यात भरदिवसा हत्यांकाड झाले. तरुणाची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्यानंतर आरोपी फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून का करण्यात आला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली गावाच्या कमानी शेजारी असलेल्या बस स्टॉप जवळ आज संध्याकाळच्या सुमारास हा थरार घडला.
घटनास्थळी अज्ञात हल्लेखोरांनी सोन्यावर गोळीबार केला. स्थानिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे . आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.