STATE NEWS सोडाना अप्पा, सोडाना.... म्हणत ती विव्हळत होती! पण ५० वर्षीय  अप्पाच्या अंगात वासनेचे भूत घुसले होते; ८ वर्षीय चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केला

 

अमरावती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): वासनेची भूक भागवण्यासाठी काही वासनांध काय करतील याचा नेम नाही..नैतिक,अनैतिक याचे त्यांना भानच उरत नाही..संभोग करण्यासाठी ते फक्त शरीराचा शोध घेत असतात, ते शरीर कुणाचेही असुदेत.. अगदी अल्पवयीन मुलगा,मुलगी यांच्यावर देखील अशा विकृतांची नजर पडते आणि त्यातून पुढे घडत ते खूप वाईट असत.. अमरावतीच्या आनंद नगर भागात अशीच एक घटना समोर आली आहे. एका ८ वर्षीय चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. नात्यातील व्यक्तीनेच चिमुकलीच्या इज्जतीवर हात उगारल्याची ही घटना आहे. विशेष म्हणजे आरोपीचे वय ५० वर्षे आहे.

 प्राप्त माहितीनुसार मुलीच्या ३२ वर्षीय वडिलांनी ही तक्रार दिली. घटनेच्या वेळी मुलीचे वडील मटणाच्या दुकानावर गेले होते. त्यावेळी नातेवाईक असलेला ५० वर्षीय अंकुश सूर्यभान पन्नासे ही मुलीच्या घरी गेला. मुलीची आई घरात झोपलेली असल्याचे त्याने पाहिले आणि त्याची नजर ८ वर्षीय चिमुकलीवर पडली. त्याने चिमुकलीला जवळ ओढले..नातेवाईक असल्याने मुलीला आधी त्याचे वाईट वाटले नाही, प्रेमाने जवळ घेत असतील तिला वाटले. मात्र नंतर अंकुश च्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने मुलीवर जबरदस्ती अनैसर्गिक अत्याचार केला..त्याचवेळी मुलीचे वडील घरी आले . सोडाना अप्पा.. सोडाना असे म्हणत मुलगी विव्हळत असल्याचे मुलीच्या वडिलांना दिसले.

दांड्याने प्रसाद दिला..!

मुलीच्या वडिलांनी घराचा पडदा ओढून बघितले असता अंकुश मुलीवर अत्याचार करीत असल्याचे दिसले. मुलीच्या वडिलांना राग अनावर झाला. त्यांनी दांड्याने आरोपीला धो धो धुतले. आवाज एकून शेजारी पाजारी धावत आले, त्यांनी मुलीच्या वडिलांच्या हातातील दांडा हिसकला आणि पोलिसांत तक्रार द्यायला सांगितले. मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.