STATE NEWS पंढरीत धाव पण त्याआधी मटणावर ताव! के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यावरून वादंग, अमोल मिटकरी म्हणाले, वारकऱ्यांच्या भावना दुखवू नका..
काल रात्री उमरगा येथे केसीआर आणि त्यांच्या टीमसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पेशल मटण बनवण्यात आल होत, विठुरायाच्या दर्शनाआधी टीम केसीआरन मटणावर ताव मारल्यामुळे आता वाद उभा राहिलाय. विठुरायाच्या दर्शनासाठी जातांना अतिशय पवित्र अंतकरणाने वारकरी जात असतात. मात्र केसीआर यांनी मटणावर ताव मारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकणावरून केसीआर यांच्यावर निशाणा साधलाय. मिटकरी यांनी ट्विटर वरून केसीआर यांच्यावर निशाणा साधलाय. " तुमची लोकप्रियता तुम्हाला लखलाभ. मला शिव्या घातल्यापेक्षा तुमचं मंत्रिमंडळ जे जेवतय ते शाकाहारी आहे का? तेवढं सांगा..प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात त्या त्यांनी कराव्यात, यात दुमत नाही..मात्र सामान्य वारकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये" असे मिटकरी यांनी म्हटले आहे. दरम्यान भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्र शाखेने मात्र जेवण शाकाहारी होत, अस म्हटल आहे.