State News : ६७ च्या म्हाताऱ्याचे ४० वर्षीय महिलेसोबत लग्न... शरीरसंबंध ठेवताना नकली दातांनी घेत होता चावा..! न्यायालय म्हणाले, त्याची बत्तीशी काढा!!

 
इंदौर : ६७ वर्षांच्या म्हाताऱ्याने स्वतःपेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या महिलेसोबत लग्न केले. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून म्हातारा पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग करू लागला. शारीरिक संबंधादरम्यान तो त्याच्या नकली दातांनी पत्नीच्या अंगभर चावा घेऊन जखमी करत होता. अखेर महिलेने पळ काढत इंदौर न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत आरोपीला अटक करण्याचे व त्याची बत्तीशी काढून घेण्याचे आदेश दिले. २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात या जोडप्याचा विवाह झाला होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह गुजरात येथील एका ६७ वर्षीय ज्वेलर्स व्यावसायिकासोबत झाला होता. मूळ इंदौरची  ही महिला लग्नानंतर सासरी गुजरातमधील उदयपूर येथे गेली. लग्नाच्या पहिल्या रात्रीच म्हाताऱ्या पतीने तिच्याशी अनैसर्गिक संभोग केला व संपूर्ण अंगावर चावे घेत जखमी केले. त्याचा हा प्रकार रोज सुरू होता.

दरम्यान पतीने बनावट दात लावले असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. पत्नीने जेव्हा पतीला त्याच्या कृत्याबद्दल विरोध केला तेव्हा माझ्या मोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत. तू जर याची वाच्च्यता केली तर संपूर्ण कुटूंबाला संपवून टाकेन, अशी धमकी तो देत होता. अखेर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पळ काढून तिने माहेर गाठले.

आधी पोलिसांत तक्रार केली मात्र पोलिसांनी या अजब तक्रारीची दखल न घेतल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हा गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदवत गुन्हा दाखल करण्याचे व आरोपीच्या अटकेचे निर्देश दिले. त्याची बत्तीशी म्हणजेच बनावट दात काढून टाका, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले. आरोपी म्हातारा मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.