STATE NEWS दहावीला ५० टक्के मिळाले अन् मित्रांनी त्याची जेसीबीतून मिरवणूक काढली..असे काय दिवे लावले?
May 28, 2024, 08:30 IST
रायगड(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): काल, दहावीचा निकाल लागला. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला.अमरावती विभागात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे..जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांचे निकाल ९० टक्यांच्या वर लागले..रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील सार्थक नारंगीकर हा विद्यार्थ्याही दहावीच्या परिक्षेत पास झाला..आता तुम्ही म्हणाल..यात काय विशेष? तर हो..आहे विशेष..सार्थक ने ५० टक्के गुण मिळवले अन् त्याच्या मित्रांनी त्याची जेसीबीतून विजयी मिरवणूक काढली.. गुलाल उधळला अन् फटाकेही फोडले..
त्याच कारण काय की..सार्थक हा नेहमी मोबाईल मध्ये गुंग असायचा..त्याच्या मित्रांना तो अभ्यास करतांना कधी दिसला नाही..त्यामुळे तू नापास होणार अशी पैज त्याच्या गल्लीतल्या मोठ्या मित्रांनी लावलेली..सार्थक मात्र म्हणायचा की मी फर्स्ट क्लास मध्ये पास होऊन दाखवील..काल लागलेल्या निकालात सार्थकने ५० टक्के गुण मिळवले अन् तो पास झाला.. मग काय गल्लीत एकच माहौल.. सार्थकच्या गल्लीतील दोस्तांनी त्याची जेसीबीतून विजयी मिरवणूक काढली, गुलालाची उधळण केली आणि फटाके फोडले..