म्हणून पती तिच्यासोबत ठेवत नव्हता शरीरसंबंध!
सौ.अश्विनी महेश सावंत (२५, लीलावती ग्रिन्स,तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे, ह. मु. मामुर्डी गाव, देहुरोड, पुणे) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून, तिचा विवाह ३ जून २०२० रोजी ताथवडे येथे महेश दत्तात्रय सावंत (रा. कृष्णलीला अपार्टमेंट, यशवंतनगर, तळेगाव, कातवी रोड,ता. मावळ जि. पुणे) याच्यासोबत झाला. लग्नानंतर पती तिला वेळ देत नव्हता. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत नव्हता. ती जवळ आली झिडकारायचा. याबद्दल तिने विचारपूस केली काही सांगत नव्हता.
२८ फेब्रुवारीला उलगडले सत्य...
पती महेशने तिला २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री खेड शिवापूर येथे नेले. तिथे त्याच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा केला. ती जातीची मुलगी नसल्याने सहा महिन्यांपूर्वी ब्रेकअप केला. तिचा व माझा आता काही संबंध नाही, असे त्याने सांगितले. त्यानंतर अश्विनीचा भाऊ योगेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी शुभांगी नावाच्या मुलीचा मेसेज आला. त्यात तिने महेश व तिच्यातील संभाषण, दोघांचे फोटो पाठवले.
योगेशने अश्विनीला याबद्दल विचारले असता तिने पतीचे एका मुलीसोबत अफेअर होते, पण नंतर ब्रेकअप झाले होते, असे सांगितले. अधिक तपास केला असता ही प्रेमसंबंध असणारी मुलगी शुभांगी यशवंतनगर,तळेगाव दाभाडे येथे पुण्यातच राहण्यास असल्याचे समोर आले. पती व तिने मिळून घटस्फोट व्हावा म्हणून प्लॅनच रचला आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप अश्विनीने केला आहे. सासरच्यांनाही पतीचे अफेअर असल्याचे माहीत असूनही लग्न लावून दिले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पती महेश दत्तात्रय सावंत (३०), सासू कल्पना दत्तात्रय सावंत (५५), सासरे दत्तात्रय पंढरीनाथ सावंत (६०), प्रेयसी शुभांगी यांच्यासह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.