ती वॉशरूमधून वस्त्रहीन बाहेर आली अन् तितक्यात...!
कोल्हापूर : फेसबुकवर मैत्री झाली, चॅटिंग झाली आणि त्याने तिला भेटायला बोलावले. हॉटेलमध्ये रूम बुक केली... रूममध्ये येताच ती वॉशरूममध्ये गेली. व्यापारी बेडवर तिची वाट पाहू लागला... ती वस्त्रहीन अवस्थेत वॉशरूममधून बाहेर आली. अन्... त्याचवेळी त्या रूमचा दरवाजा उघडून पाच- सहा जण आत आले... त्यातील एक जण म्हणे तू माझ्या बहिणीची अब्रू लुटली... तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो... व्यापारी गयावया करू लागला... त्याला मारहाण करत त्याच्याच कारमध्ये कांेबून कुशीरे घाटात नेण्यात आले. ५० लाखांची खंडणी मागण्यात आली. १० लाखांत तडजोड झाली. १ लाख लगेच व्यापाऱ्याने दिले. उर्वरित ९ लाखांसाठी पुन्हा धमक्या सुरू झाल्या... व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठल्याने आता पोलिसांनी या खंडणीबहाद्दरांचा शोध सुरू केला आहे. हा प्रकार कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका कापड व्यापाऱ्यासोबत हा प्रकार घडला. मनिषा (नाव बदलले आहे) या तरुणीने आधी फेसबुकवर या व्यापाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिथे चॅटिंग करत मैत्री वाढवली. व्यापाऱ्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ती आढेवेढे घेत तयार झाली. दोघेही कारने सादळे मादळे येथे गेले. तिथे मनिषानेच व्यापाऱ्याला हॉटेलची रूम भाड्याने घेण्यास सांगितलं होतं. व्यापाऱ्याच्या मनात लालसा निर्माण झाली. हॉटेलमध्ये सोनाली वॉशरूममधून जशी नग्न बाहेर आली, तसे रूममध्ये दरवाजा उघडून घुसलेल्या पाच ते सहा जणांनी रंगेहात पकडत बलात्काराचा आरोप करायला सुरुवात केली. एक म्हणे माझ्या बहिणीची इज्जत लुटली, दुसरा म्हणे माझ्या पत्नीची अब्रू लुटली... बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणून त्यांनी व्यापाऱ्याच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेतले. नंतर त्याला त्याच्याच कारमध्ये कोंबून कुशीरे घाटात नेण्यात आले.
आधी व्यापाऱ्याला ५० लाख रुपये मागण्यात आले. पण व्यापारी गयावया करू लागल्याने १० लाख देण्याचे ठरले. व्यापाऱ्याने एक लाख रुपये दिले. बाकी नऊ लाखांसाठी मग फोनवर धमक्या यायला सुरुवात झाल्या. व्यापाऱ्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मनिषा आणि तिच्या सहकाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आणखी एक हनी ट्रॅपचे प्रकरण शिरोली एमआयडीसीत समोर आले आहे. भांडे व्यापाऱ्याला एका तरुणीने हनी ट्रॅपमध्ये ओढले. या प्रकरणातील तरुणी अल्पवयीन आहे. तिचा विवाह झाला आहे. तिच्या पतीने तिला या व्यापाऱ्याला जाळ्यात ओढण्याचे सांगितले होते. एप्रिल २०१९ पासून तरुणी आणि तिच्या पतीने व्यापाऱ्यांकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणून ३५ लाख रुपये उकळले आहेत. एवढे पैसे देऊनही त्रास वाढतच चालल्याने शिरोली एमआयडीसी पोलिसांत व्यापाऱ्याने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणी व तिचा पती आणि त्यांच्या आणखी ५ सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच तरुणीने एका पंचायत समिती सदस्यालाही अशाच पद्धतीने फसवल्याचे समोर आले आहे.