तुझी आई तिथे लपली आहे म्हणत १४ वर्षीय मुलीला नेले खोलीत...
तीनदा लैंगिक अत्याचार!; प्रकरण दडपण्यासाठी म्हणाला...
Nov 3, 2021, 00:35 IST
अहमदनगर ः तुझी आई तिथं लपली आहे... माझ्याबरोबरच चल दाखवतो असे म्हणून नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीला एका खोलीत नेऊन तरुणाने तीनदा लैंगिक अत्याचार केला. मुलीने घरी हा प्रकार सांगितल्यावर तुमचा सर्व खर्च देतो. तिला पपई खाऊ घाला, गर्भ राहणार नाही, असा दबाव तरुणाने तिच्या कुटुंबावर टाकला. मुलगी आणि तिच्या नातेवाइकांनी राहुली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
राहुरीच्या (जि. अहमदनगर) फॅक्टरी परिसरात पीडित मुलगी कुटूंबासह राहते. महिन्यापूर्वी रात्री साडेदहाला जेवण उरकल्यानंतर कचरा टाकण्यासाठी ती बाहेर आली. त्यावेळी पेंटर काम करणाऱ्या अर्जुन दीपक परदेशी या तरुणाने तिला गाठले. तुझी आई इथे लपून बसली. माझ्याबरोबर चल. मी दाखवतो, असे म्हणून त्याने तिचा हात धरून एका खोलीत नेले हाेते. तिथे तिच्यावर जबरदस्ती करत तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी त्याने मुलीला दिली. मात्र मुलीने घरी सांगितले. त्यानंतर तिचे कुटुंबिय अर्जुनला जाब विचारायला गेले असता त्याने पोलिसांत प्रकरण जाऊ नये म्हणून सर्वकाही आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तुमचा सर्व खर्च देतो. मुलीला पपई खाऊ घाला. तिला गर्भ राहणार नाही, असे सांगून दबाव टाकला. मात्र या घटनेनंतरही अर्जुन वारंवार पीडित मुलीचा पाठलाग करत असल्याने घाबरलेल्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले.