शनि साडेसातीचा काळ लवकरच होणार सुरू! "या' राशींच्या लोकांनी जपून राहिलेलंच बरं...
 

 
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह त्याची राशी बदलतो तेव्हा त्याच्या मानवी जीवनावर नक्कीच परिणाम होतो. २०२२ या वर्षात अनेक ग्रह व त्यांची राशी बदलणार आहेत. विशेष म्हणजे न्यायाची देवता असलेला शनिदेखील या वर्षात राशी बदलणार आहे. शनिच्या राशी बदलाला ज्योतिष्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

शनि सध्या मकर राशीत आहे. शनि ग्रह जेव्हा राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनि साडेसाती सुरू होते, तर काही राशींवर शनिची कृपादृष्टी सुरू होते. मागील वर्षात शनि ग्रहाने राशी बदलली नव्हती. मात्र २०२२ मध्ये शनि राशी बदलणार आहेत. शनिच्या साडेसातीचे तीन चरण असतात. पहिल्या चरणात शनि मानसिक त्रास देतात, दुसऱ्या चरणात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो तर तिसऱ्या चरणात शनि साडेसातीमुळे होणारे त्रास कमी होऊ लागतात.

तिसऱ्या चरणात शनी व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देतो. शनिच्या साडेसातीचे तीन टप्प्यांपैकी साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात त्रासदायक मानला जातो. शनि सध्या मकर राशीत आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि धनु राशीला साडेसाती सुरू आहे. मकर राशीत साडेसातीच्या दुसरा टप्पा सुरू असताना पहिला टप्पा कुंभ राशीत तर शेवटचा टप्पा धनु राशीत सुरू आहे. २९ एप्रिल २०२० रोजी शनि पुढील राशी बदलणार आहे.

या काळात मकर राशी सोडून शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनिच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या त्रासांना समोर जावे लागू शकते. दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात चढ - उतार येऊ शकतात. त्याला शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. शनि हा कुंभ राशीचा अधिपती ग्रह असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा बाकीच्या राशींच्या तुलनेत कमी वेदनादायक असेल. मकर आणि मीन राशींवर प्रभाव शनीच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांवर शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. मीन राशीवर पहिला टप्पा सुरू होईल.