सलमान खुर्शीद पुरुष वेशातील कंगणा!; संजय राऊत संतापले!!
Nov 12, 2021, 20:39 IST
मुंबई ः हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हराम या अतिरेकी संघटनांच्या विचारांशी केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. खुर्शीद हे पुरुष वेशातील कंगणा असल्याची टीका त्यांनी केली.
खुर्शीद यांनी ‘सनराइज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात लिहिले आहे, की साधू- संतांच्या पूर्वापार आणि प्राचीन हिंदू परंपरेला सध्याच्या राजकीय हिंदुत्वाने बाजूला केले असून, आताचे हिंदुत्व आयसिस व बोको हराम या इस्लामिक संघटनांप्रमाणे जिहादी प्रवृत्तीचे आहे. बुधवारी हे पुस्तक प्रकाशित झाल्याने भाजपाने आक्षेप घेत काँग्रेस आणि खुर्शीद यांच्यावर टीका केली. सोनिया गांधी यांचा खुर्शीद यांना पाठिंबा आहे का, या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी का केली जात नाही, असा सवाल भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काल केला होता. खुर्शीद यांच्याविरोधात विवेक गर्ग व विनित जिंदल या वकिलांनी पोलीसही तक्रारही केली आहे. त्यानंतर आज, १२ नोव्हेंबरला राऊत यांनीही खुर्शीद यांच्यावर शरसंधान साधत त्यांना कंगणाची उपमा दिली. काँग्रेस आणि राहुल गांधींना अडचणीत आणण्याचा हा खुर्शीद यांचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले.