रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका! म्हणाले, दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठेय?
Dec 20, 2021, 15:22 IST
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बदनापूर येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
विना मुख्यमंत्र्यांचे राज्य चालते का, असा सवाल दानवे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमेवर सुद्धा दानवे यांनी खरपूस टीका केली. मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाला जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांना जबाबदार आहे हे तुम्हीच मला सांगा, असे आवाहन त्यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना केले. आता तर दोन महिन्यांपासून हा पठ्ठ्या कुठे आहे हे कुणीच काही सांगू शकत नाही. असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले.