लॉकडाऊनच्या चर्चांमुळे पालक पुन्हा संभ्रमात, मुलांना शाळेत पाठवावे की नाही?

 
मुंबई ः कोरोनाचे रुग्ण राज्यात पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे पालकही धास्तावले असून, आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे की नाही, ही चिंता त्‍यांना सतावत आहे. डिसेंबरमध्ये अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थिनीही शाळेत जात होते. मात्र आता पालकांना फेरविचार करण्याची वेळ आली आहे. अनेक पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याने वर्गातील उपस्‍थितीही कमी होत चालली आहे.
सध्या अनेक शाळा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्‍ही प्रकारचे वर्ग भरवत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय शाळांनी पालकांवर सोडला आहे. विद्यार्थी शाळेत येत असतील तर त्‍यासाठी पालकांची संमतीपत्रेही मागविली आहेत. दरम्‍यान, कोरोनामुळे राज्‍य सरकारने शिक्षणाआधी आरोग्याची चिंता करावी. शाळा सुरू ठेवण्याबद्दल प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने केली आहे.