नितेश राणे म्‍हणतात, नवाब मलिक देशद्रोही!; त्‍यांना पाकिस्तानमध्ये पाठवा...
 

 
मुंबई ः नवाब मलिक गद्दार असून, दहशतवाद्यांना साथ देणारे ते देशद्रोही आहेत. त्‍यांना पाकिस्तानला पाठवा, असे एकेरी बोलत भाजपा नेते नितेश राणे यांनी तुम्ही पत्रकार मित्रसुद्धा कशाला त्यांची मुलाखत घेता, असा प्रश्न पत्रकारांनाही केला.
मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. राणे यांनी आंदोलनाला भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्‍यावर शरसंधान साधले. मंत्रिमंडळात मलिक यांना स्थान का देण्यात आलंय, असा प्रश्नही त्‍यांनी केला. भाजपाने केंद्राकडून खासगीकरण झालेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठीही रस्त्यावर उतरावे, अशी टीका मलिक यांनी केली होती. त्‍यावर प्रश्न केला असता राणे हे मलिक यांच्‍यावर भडकले होते.