नवा वाद! इंदुरीकर महाराजांना मंत्री टोपे समजावून सांगणार!!

 
नाशिक : कीर्तनकार इंदुरीकर महाराज नव्या वक्‍तव्यामुळे सध्या वादात सापडले आहेत. मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. काही होतच नसेल तर घेऊन करायचे काय? असा वक्‍तव्‍य त्‍यांनी केले होते. त्‍यावर आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली असून, इंदुरीकर महाराजांना जागतिक स्तरावर लसीला असलेले महत्त्व समजावून सांगेन. ते माझ्या जवळच्या परिचयाचे आहेत, असे ते म्‍हणाले.

मी सगळीकडे फिरतो. पण मला कोरोना होतच नसेल तर लस घेऊन काय करायचे? असा प्रश्न करत कोरोनावर एकच औषध आहे. मन खंबीर ठेवा, असे इंदुरीकर महाराज म्‍हणाले होते. त्‍यावर श्री. टोपे म्‍हणाले, की इंदुरीकर महाराज चांगले समाजप्रबोधक आहेत. कीर्तनातून समाजाला चांगला संदेश देतात. त्‍यामुळे लोक त्‍यांच्‍या कीर्तनाला गर्दी करतात. मी त्‍यांना लसीचे महत्त्व नक्‍कीच समजावून सांगेन, असे ते म्‍हणाले.  अाता इंदुरीकर महाराज टोपेंचं म्‍हणणं तरी ऐकतात का, याची उत्‍सुकता सर्वांना निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त घोटी बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. त्‍यावेळी इंदुरीकर महाराजांनी हे वक्‍तव्‍य केले. विशेष म्‍हणजे महाविकास आघाडीचे नेतेही या कार्यक्रमाला हजर होते.