उतावीळ नवरा... साखरपुड्याच्या दिवशीच ठेवले शरीरसंबंध!; लग्नानंतर १४ दिवसांत ती निघाली १४ आठवड्यांची गर्भवती!; पती म्हणाला, हे बाळ माझे नाही...
सौ. मंजुषा चेतन वाघरे (२७) हिने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. मंजुषा एका खासगी कंपनीत नोकरी करते. गेल्या वर्षी २५ जानेवारीला तिचा साखरपुडा त्यांच्या जय भवानीनगरातील राहत्या घराच्या गच्चीवर शहरातीलच शिवाजीनगरात राहणाऱ्या चेतन गणपतराव वाघरे (३३) याच्याशी झाला होता. दुपारी मंजुषा, चेतन व एक फोटोग्राफर खाली आले होते. फोटो काढणे झाल्यानंतर खोलीत मंजुषा आणि चेतन दोघेच होते. चेतनने तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.
तिने नकार दिला असता आता आपले लग्न होणारच आहे, असे म्हणत त्याने संबंध ठेवलेच. ७ मार्च २०२१ ला दोघांचे लग्न झाले. २५ मार्च २०२१ ला प्रेग्नंसी किटने तपासणी केली असता मंजुषा गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर सोनोग्राफी केली असता मंजुषा १४ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरी आल्यावर पती चेतन हा मंजुषाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. हे बाळ माझे नाही, असे त्याचे म्हणणे होते, असे मंजुषाने तक्रारीत म्हटले आहे.
घरातील सर्वच लोक मंजुषाला शिविगाळ व मारहाण करू लागले. तुम्ही पाच लाख घेऊन या तरच तुमच्या मुलीला सांभाळू, असे म्हणत मंजुषाच्या वडिलांदेखत चेतनने तिच्या पोटावर लाथा मारल्या व घराबाहेर हाकलून दिले. चेतनने मारहाण केल्याने मंजुषाचा गर्भपात झाला. त्यानंतर महिला तक्रार निवारण केंद्रात समझोता करण्याचा प्रयत्न होऊनही समझोता न झाल्याने मंजुषाने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून मंजुषाचा पती चेतनसह सासू, सासरे, दीर, जाऊविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.