ठरल...! "या" दिवशी पडणार पाऊस; पंजाबरावांनी सांगितली नवी तारीख; पेरणीसाठी दिला महत्वाचा सल्ला..

 
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): जून अर्ध्यापेक्षा जास्त उलटून गेला तरी जिल्ह्यात, राज्यात अजूनही पाऊस पडलेला नाही. मान्सून सध्या तळकोकणातच असून तो अद्याप पुढे सरकलेला नाही. त्यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे राज्यातला शेतकरी चिंतेत सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पूर्ण तयारी केली आहे, बियाण्याची खतांची खरेदी केली आहे. मात्र अद्याप पावसाची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
दरम्यान आता मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डखांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुजरात मध्ये आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून वर थेट परिणाम झाला, चक्रीवादळ आले नसते तर आतापर्यंत बहुतांश महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असता असेही पंजाबराव म्हणाले.
दरम्यान आता पंजाबरावांनी नवीन अंदाज दिला आहे.२५ जून पासून १५ जुलै पर्यंत समाधान कारक पाऊस पडणार असल्याचे डख यांनी म्हटले आहे. २५ जून पासून पावसाची तीव्रता वाढेल,२६ ते २८ जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. याचाच अर्थ जूनअखेर पेरणीयोग्य पाऊस पडल्याने पेरणी प्रारंभ होईल. तसेच या काळात जिथे पाऊस होणार नाही तिथे १० ते १५ जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुरेशी ओल होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असेही हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.