Crime news: नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला लावली "त्या" गोष्टीची चटक! ३२ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला पोर्न व्हिडिओ दाखवून नको ते केलं..!
अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांनी याप्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. प्राप्त माहितीनुसार आरोपी महिला नाशिक शहरात पतीपासून विभक्त राहते, तिला दोन मुले देखील आहेत. पिडीत मुलगा कल्याणच्या एका शाळेत नवव्या वर्गात शिकतो.
अशी झाली ओळख अन् ओढले जाळ्यात...
दरम्यान पीडित मुलाची एक आत्या नाशिक मध्ये आरोपी महिलेच्या घराजवळ राहते. मुलाची आत्या आणि आरोपी महिलेची घट्ट मैत्री होती. पिडीत मुलगा नाशिकला आत्याच्या घरी आला तेव्हा त्याची ओळख त्या महिलेशी झाली. त्याचवेळी महिलेने मुलासोबत जवळीक वाढवली. दरम्यान मुलाची आत्या जेव्हा जेव्हा कल्याणला जायची तेव्हा तेव्हा आरोपी महिला देखील कल्याणला जात होते, त्यामुळे मुलाची आणि आरोपी महिलेची आणखी जवळीक वाढली.
एके दिवशी...!
दरम्यान एके दिवशी मुलगा नाशिकला आत्याच्या घरी गेलेला होता. त्यावेळी महिलेने मुलाला आपल्या घरात बोलावलं. बेडरूम मध्ये नेत त्याला बळजबरी दारू पाजली, त्यानंतर त्याला पॉर्न व्हिडिओ दाखवले. मुलाचं मानसिक संतुलन बिघडवल, त्यानंतर तिने मुलासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ सुध्दा बनवले.
असा झाला भांडाफोड...!
सातत्याने होणाऱ्या या प्रकारानंतर मुलाला दारूची चटक लागली. तो वारंवार महिलेशी फोनवरून गप्पा मारू लागला, या सगळ्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ लागल्याने मुलगा बिघडत चालल्याच मुलाच्या आईला वाटू लागलं. एक दिवस मुलाच्या नकळत त्याच्या आईने त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईल मधील व्हिडिओ पाहून मुलाच्या आईच्या पायाखालील जमीनच सरकली. मुलगा एका महिलेसोबत शारीरिक संबंध बनवत असल्याचा तो व्हिडिओ होता. स्वतःला सावरत मुलाच्या आई वडिलांनी मुलाला त्याबद्दल विचारणा केल्यावर मुलाने सगळा घटनाक्रम सांगितला. मुलाला आईवडिलांनी एका बालसुधारगृहात दाखल केले. दरम्यान त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे.