या राशींची मुले ठरतात आदर्श पती; बायकोला जपतात फुलासारखं...!

 
मुंबई ः आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येकाच्या नशिबात मनासारख्या गोष्टी घडतीलच असे नसते. मुलींना तर स्वप्नातला राजकुमारच जोडीदार हवा असतो. मात्र कुणाला कसा नवरा मिळणार हे ज्याचं त्याचं नशीबच ठरवतं. मात्र ज्योतिष्य शास्‍त्रानुसार चार राशींची मुले आदर्श पती असतात. बायकोला ते अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे अन्‌ गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपतात. कोणत्या आहेत त्या चार राशी जाणून घेऊयात...
  • कर्क : या राशीच्या मुलांचे वैवाहिक जीवन अतिशय आनंदी असते. आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. प्रत्येक गोष्टीत बायकोचं मत घेणं त्यांना आवडतं. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या चंद्राच्या प्रभावाखाली या राशीची मुलं शांत स्वभावाची असतात. ते भांडण होऊ देत नाहीत. लाइफ पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात.
  • सिंह : वृषभ राशीची मुले चांगले पती असल्याचे स्वतःला सिद्ध करतात. ते घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात. आणि कुटुंबाचा आर्थिक डोलारा ही सांभाळतात. वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा विलास आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशींच्या मुलाकडे मुली नेहमीच आकर्षित होत असतात. आपल्या पत्नीवर ते खूप प्रेम करतात आणि पत्नीसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. स्वभाव आक्रमक असला तरी पत्‍नीबद्दल ते हळवे असतात. प्रचंड प्रेम करत असल्याने प्रेमाच्या आड येणाऱ्या गोष्टीही त्‍यांना आवडत नाहीत. जोडीदाराची सुरक्षा करण्यात ते पुढे असतात.
  • धनु : धनु या राशीच्या मुलांचा स्वभाव अतिशय संयमी आणि गंभीर असतो. या राशीच्या मुलांना अध्यात्मात रस असतो. ते वरतून कठोर आणि कणखर दिसत असले तरी आतून तितकेच निर्मळ आणि कोमल मनाचे असतात. प्रत्येकाशी नाते प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे जपतात. त्यांच्यासाठी प्रेम जीवन हे सर्वात महत्त्वाचे असते. जोडीदाराबद्दल ची वाईट गोष्ट ऐकून त्यांच्या मनाला प्रचंड दुःख होते.
  • मीन : या राशींची मुले खूप शांत स्वभावाची असतात. बायकोला ते पापण्यांच्या डोळ्यावर बसवून ठेवतात. त्यांच्या मनात कधीही फसवणुकीचा विचार येत नाही. वैवाहिक जीवनाला ते सर्वाधिक प्राधान्य देतात. या राशींची मुले खूप रोमँटिक असतात.