ब्रेकिंग!ठरलं... नगरपरिषदांसाठी २ डिसेंबरला मतदान! ३ डिसेंबरला; मतमोजणी असा आहे कार्यक्रम....
Nov 4, 2025, 16:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार २ डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
असा आहे कार्यक्रम..
१० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.१७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. १८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज यांची छाननी होईल. २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल. २६ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल.२ डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.