BIG NEWS पोलिसांकडून आमदाराची गाडी धुण्याचे प्रकरण तापले!विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कडाडले! म्हणाले, फडणवीसांनी पोलिसांची काय दुर्दशा करून ठेवलीय..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असतानाचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आज,२९ ऑगस्टच्या सकाळपासून व्हायरल झाला होता. आता हे प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणावर घणाघाती टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची काय दुर्दशा करून ठेवली असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे...
अंबादास दानवे यांनीदेखील तो व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वर अपलोड केला आहे. "पोलिसांवर कुत्र्यासारखा धावून जाणारा नपुंसक काल बघितलाच आपण, महाराष्ट्रातले गृहमंत्री एवढे निष्क्रिय की आता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडी पण धुवून द्यायची वेळ आली.
फडणवीसांनी पोलिसांची काय दुर्दशा करून ठेवली असा सवाल ना.दानवे यांनी केला. ही पोस्ट दानवे यांनी फडणवीस यांना टॅग केली आहे.
Related img.
​​​​​​