एका प्रेमाची दुर्दैवी कहानी...!; विवाहानंतर तिला भाड्याची खोली अन् घरात नवी बायको!!
Feb 14, 2022, 13:05 IST
अमरावती ः साथ जियेंगे मरेंगेच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रेमविवाह केला; पण तिला घरी नेलेच नाही. भाड्याने खोली करून दिली. नंतर तिला कळले की त्याने समाजातील एका मुलीसोबत लग्न केलंय. ती त्याच्या घरी गेली तेव्हा त्याच्या आई-वडील, नणंद आणि दुसऱ्या बायकोला हाकलून लावले. त्याला सोडचिठ्ठी दे अन्यथा मारून टाकू, अशी धमकी दिली. तिने पतीला विचारले तर त्याने लग्न झालेच नसल्याचे सांगून तिला घरी घेऊन जाण्यास नकार दिला. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात २७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २४ वर्षीय पती, सासू-सासरे, नणंद, दुसरी बायको यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. मीरा हर्षल खंगार या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. हर्षल सुधाकर खंगार असे तिच्या पतीचे नाव आहे. २६ मे २०२० रोजी त्यांनी न्यायालयात विवाह केला होता. काही दिवसांनंतर अमरावती येथे भाड्याने खोली करून दोघे राहू लागले. हर्षला तिथून त्याच्या घरी येणे जाणे करत होता. मात्र तिला घरी नेत नव्हता. तिने अनेकदा विनंती केली. मात्र तो टाळत होता. एक दिवस तिला कळले की त्याने दुसरे लग्न केलेय. तिने याबद्दल त्याला विचारले असता त्याने तू माझी पत्नी नसून, मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हणून शिविगाळ केली. ती त्याच्या घरी गेली असता सासू, सासऱ्यांनी तू आमची सून नसून माझ्या मुलाची बायकोही नाही. त्याला सोड नाही तर खतम करून टाकू, अशी धमकी दिली.