डॉक्टरही अडकला "पायल"च्या जाळ्यात! व्हिडिओ कॉलवर डॉक्टरने तिच्यासमोर सगळच दाखवलं; तिने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पावणे दोन लाख!

 
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): फेसबुकवर पायलची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर तरुण वयातील डॉक्टरला गुदगुल्या झाल्या. त्याने तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. फेसबुक वर दोघांमध्ये चॅटिंग झाले..त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले..आता फोनवरही बोलणे सुरू झाले. तिच्या गोड आवाजाने डॉक्टर तर पुरता फिदा झाला..एक दिवस तिने व्हिडिओ कॉल करून डॉक्टरला तिच्या सौंदर्याचे दर्शन घडवल्यवर डॉक्टर अक्षरशः घायाळ झाला. मात्र पायल आपल्याला मोठा चुना लावून आपल्याशी चांगलाच खेळ खेळणार आहे याची पुसटशी कल्पनाही डॉक्टरला त्यावेळी आली नाही..

त्याचे झाले असे की हा डॉक्टर म्हणजे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  प्रॅक्टिस करणारा डॉक्टर हाय. फेसबुकवर त्याला पायल जोशी नावाच्या एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर दोघांचे फेसबुकवर चॅटिंग झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. फोनवर बोलणे झाल्यावर एक दिवस रात्री पायलने डॉक्टर तरुणाला व्हिडिओ कॉल केला. तिचे सौंदर्य पाहून डॉक्टर पुरता घायाळ झाला अन् तिच्या प्रेमात पडला. दुसऱ्या दिवशी तरुणीने डॉक्टरला फोन करून मोबाईल घेण्यासाठी १० हजार मागितले. त्याने तिला १० हजार पाठवून दिले. मासा जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यानंतर तिने तिच्या पुढच्या खेळाला सुरुवात केली.
   
अश्लील व्हिडिओ कॉल केला रेकॉर्ड..!

 पायलने तरुण डॉक्टरला रात्री व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर तिने तिच्या "अंतरंगी" सौंदर्याचे दर्शन घडवून त्याला उत्तेजीत केले. त्यानंतर ती जसे सांगेल तसे तो करू लागला. त्याने त्याच्या अंगावरील एक एक करीत सगळेच कपडे काढले आणि अश्लील चाळे केले. त्याच वेळी पायलने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. मात्र हे डॉक्टरच्या लक्षात आले नाही.  दुसऱ्या दिवशी तिने तो व्हिडिओ डॉक्टरच्या मोबाइलवर पाठवला. व्हिडिओ पाहून डॉक्टरच्या पायाखालची जमीन सरकली.

तो व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर  तिने ५० हजारांची मागणी केली. ५० हजार मिळाल्यावर पुन्हा १ लाख मागितले. त्यानंतर पुन्हा ५० हजार मागितले. डॉक्टर पैसे देउन वैतागला.  तिने पुन्हा शेवटचे पुन्हा २५ हजार  मागितले. डिप्रेशन मध्ये आलेल्या डॉक्टरला एका डॉक्टर मित्राला पैसे मागितले. मित्राने पैसे मागितल्याचे कारण विचारल्यावर त्याने घडलेली हकीकत सांगितली. मित्राने धीर दिल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पायल जोशी नामक तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.