धक्कादायक..! अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले, मी तुझ्याशीच लग्न करेन!
 

 
अमरावती : दोन वर्षांपूर्वी  फेसबुकवर दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ती अल्पवयीन आणि तो २२ वर्षांचा. काही दिवसांनंतर तिला त्याच्या स्वभावाचे बरेच पैलू माहीत होऊ लागले... त्याला तलवार बाळगण्याचा, बंदूक हातात घेऊन फोटोशूट करण्याचा, भाईगिरीचा शौक होता. त्याने भाईगिरी चक्क तिच्यावरच दाखवायला सुरुवात केली. 'मी तुझ्याशीच लग्न करेन. मी १८ वर्षां झाले की तुझ्यासोबत पळून येईन... असे बंदुकीच्या धाकावर त्याने तिच्याकडून लिहून घेतले. अखेर त्याची भाईगिरी जास्त वाढल्याने मुलीने घडला प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीच्या आईने अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सैय्यद सोहेल सैय्यद गफ्फार  (२२, रा. चांदणी चौक, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद सोहेल याची अमरावती शहरातील गाडगेनगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीशी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीतून मैत्री झाली. त्यातून भेटीगाठी सुरू झाल्या.१९ ऑगस्ट २०२० रोजी सय्यदने तिला बंदुकीचा धाक दाखवला. 'मी तुझ्याशीच लग्न करेन. १८ वर्षांची झाली की तुझ्यासोबत पळून येईल...' असे त्याने तिच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले.

दरम्यान काही दिवसांनी सय्यदची एक महिला नातेवाइक पीडित मुलीच्या घरी गेली. तुमच्या मुलीला सांभाळा नाही तर आमचा सय्यद तिला पळवून नेईल, अशी धमकी मुलीच्या आईला दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. मुलीने जे घडले ते आईला सांगितला. सय्यद गुंड आहे. तलवार आणि बंदूक हातात घेऊन फोटो काढायचा त्याला शौक आहे. हातात तलवार घेतलेले काही फोटो त्याने मुलीच्या वडिलांनासुद्धा पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून सय्यद सोहेल आणि त्याच्या महिला नातेवाइकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.