STATE NEWZ तेरे प्यार के लिए कुछ भी करेंगे.! प्रियकराने प्रेयसीसाठी केलं भयंकर विकृत कृत्य..!

 
छत्रपती संभाजीनगर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): प्रेमासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही.  कधी कधी आंधळ्या प्रेमात वेडे झालेले अनेक जण आपण बघितले असतील . काही तरी प्रेयसीसाठी जीव ओवाळून टाकायला तयार असतात. हे शक्यच नाही हे माहीत असले तरी काही जण तुझ्यासाठी चंद्र आणिन, तारे आणिन अशी भाषा करत असतात..बर ते जाऊद्या थेट मुद्द्यावर येऊ. छत्रपती संभाजीनगरात एका प्रियकराने प्रेयसीसाठी चक्क दुकानदारावर चाकूहल्ला केलाय. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झालाय.

छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी भागात ही घटना घडली.  सौरभ नगराळे असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे तर सुनीता चौथमल असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. मुकुंदवाडी भागातील एका दुकानदाराला सौरभ ने सुनीताला २ हजार रुपये द्यायला सांगितले होते. सुनिता त्या दुकानदाराकडे गेली आणि त्याला २ हजार रुपये मागितले मात्र दुकानदाराने पैसे दिले नाहीत. ही बाब सूनिताने सौरभला सांगितले. 
   
त्यामुळे रागाने लालबुंद झालेला सौरभ दुकानदाराकडे गेली. त्यांच्यात बाचाबाची झाली. या झटापटीत सौरभने दुकानदार संजय धर्मे यांच्या हातावर ,खांद्यावर सपासप चाकूने वार केले. यामुळे दुकानदार गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर सौरभ पसार झाला. दरम्यान मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सौरभ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.