STATE NEWS माझ्या बॉयफ्रेंडसोबत कशाला फिरते? एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड मध्ये भर बाजारात फ्री स्टाईल! बॉयफ्रेंड पळून गेला..!!

 
पैठण ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  एका मुलीसाठी दोन तरुणांमध्ये हाणामारी  अन वादविवाद तुम्ही नक्कीच बघितले असतील. मात्र एकाच मुलासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या मूली दिसत नाही.. एकाच मुलावर जर दोन मुली प्रेम करत असतील तर मुले त्याला फार नशीबवान समजतात. असाच एक प्रकार पैठणच्या बसस्थानक परिसरात समोर आलाय. एका बॉयफ्रेंडसाठी चक्क दोन मुलींचे कडाक्याचे भांडण झाले. दोघींनी एकमेकिंचे केस लुचले, एकमेकींच्या कानाखाली वाजवल्या..! अखेर महिला पोलिसांनी दोघींना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची समजूत काढली. या सगळ्या भानगडीत ज्या बॉयफ्रेंडसाठी त्या भांडत होत्या तो मात्र पसार झाल्याचे दिसून आले.

भांडण करणाऱ्या दोन मुली अल्पवयीन असून बारावीत शिकतात. पैठणच्या बसस्थानक परिसरात आपला बॉयफ्रेंड दुसरीसोबत फिरत असल्याची माहिती एका तरुणीला मिळाली. त्यामुळे ती तडक बसस्थानक परिसरात पोहचली. तिथे तिचा बॉयफ्रेंड सोबत दुसरीसोबत फिरत असल्याचे पाहून तिचा पारा चांगलाच चढला. अन् मग राडाच सुरू झाला! 

दोघीजणी एका बॉयफ्रेंडसाठी एकमेकींना भिडल्या. वाद हाणामारीपर्यंत पोहचला. झोंबाझोंबी अन त्यानंतर केसांची लुचालुची झाली. हा गोंधळ वाढत असल्याचे पाहून बॉयफ्रेंड मात्र घटनास्थळावरून पसार झाला. हा राडा जवळपास अर्धा तास चालला. यावेळी उपस्थित लोकांनी वाद सोडवायचा प्रयत्न केला मात्र वाद थांबत नव्हता.

अखेर बसस्थानकवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती ठाणेदारांना दिली. ठाणेदारांनी महिला पोलिसांना पाठवून दोन्ही तरुणींना पोलीस ठाण्यात आणले. भांडणाचे कारण विचारल्यावर आपल्या बॉयफ्रेंड वर तिने ताबा केल्याचे दोघींनी सांगितले. कारण ऐकून क्षणभर पोलीसही चक्रावले. अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केला म्हणून दोन्ही तरुणीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.