STATE NEWS .... म्हणून नितीन गडकरींच आणि आमचं जुळत! राज ठाकरेंनी उलगडल गुपित..!!

 
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कधी गडकरी राज ठाकरेंना भेटतात तर कधी राज ठाकरे गडकरींच्या भेटीसाठी जातात. या दोघांचं एव्हढ कसं जुळत हो? असा प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकदा विचारला जातो,त्याच उत्तर आता खुद्द राज ठाकरेंनी देऊन टाकलय. नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरी आणि राज ठाकरे एका मंचावर होते. या कार्यक्रमात ठाकरेंनी गडकरींची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांचं एवढं का जुळत हे सांगितलं.
 

      जाहिरात

राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल, १८ सप्टेंबर रोजी राज यांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली. नागपुरातल्या फुटाळा तलावाची आणि संगीत कारंजाचा लेझर शो पाहिल्यानंतर ठाकरेंनी गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

 आज नागपुरात जे काही पाहिलंय तस भारतात दुसरीकडे पाहिलं नाही. जे काही बघितलय ते भारताच्या बाहेरच  बघितल. गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्य करतात. ते खाली काही करतच नाही. सगळ वरूनच करतात. उड्डाणपूल वरच जातो, कारंजाही वरच जातो. आमच्या दोघांची मन जुळण्याच कारण म्हणजे आमच्या दोघांचाही विचार भव्य दिव्य असतो असे राज ठाकरे म्हणाले. गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा काहींना वाटत हे कसं शक्य आहे, मात्र ते झाल्यावर कळत की गडकरींनी करून दाखवलं असेही राज ठाकरे म्हणाले.