STATE NEWS संतापजनक! देशात राहून देशाशी गद्दारी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी
Sep 24, 2022, 12:27 IST
पुणे( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतापजनक प्रकार समोर आलाय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाई विरोधात काही विशिष्ट समुदायातील लोकांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देण्यात आले.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन करण्याची तयारी या लोकांनी केली होती. मात्र आंदोलन सुरू होण्याआधी पुणे पोलिसांनी आदोलकांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद ची घोषणाबाजी केली. या घोषणा बाजीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून आंदोलकांनी आरएसएस मुर्दाबाद च्या घोषणा सुद्धा दिल्या आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.