STATE NEWS ब्रेकअप झालेल्या प्रियकराला मिळविण्यासाठी "ओम् फट्ट स्वाहा:!" "तुझा जानू तुला मिळवून देतो" म्हणत मांत्रिकाने तरुणीला लावला दीड लाख रुपयांचा चुना!
खारघर येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीची नांदेडच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. अनेक वर्षे प्रेमसंबंधात घालवल्यानंतर त्यांच्यात काही करणाने ब्रेकअप झाले. त्यानंतर पुन्हा तरुणीने तिच्या प्रियकराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन नंबर बदलला होता. शिवाय तो आता कुठे राहतो काय करतो याबद्दल तरुणीला माहिती मिळत नव्हती. अशातच तरुणीच्या एका मैत्रिणीने तिला "खानसाहेब" नावाच्या भोंदू बाबाची भेट घालून दिली. तुझा "जानू" मी तुला परत मिळवून देईल असे म्हणत खानसाहेब ने पुजा करण्याच्या नावाखाली तरुणीकडून जवळपास दीड लाख रुपये उकळले.
मात्र दोन तीन महिने उलटल्यानंतर सुद्धा तरुणीला तिचा जानू परत मिळाला नाही. त्यामुळे तरुणीने भोंदू खानसाहेब ला पैसे परत मागितले असता भामट्याने फोन बंद करून टाकला. अखेर प्रयत्न करूनही जानू मिळत नसल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत भोंदू बाबा विरुद्ध फसवणूकीची तक्रार दिली. पोलिसांनी भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.