STATE NEWS  खळबळजनक!गर्लफ्रेंड सोबत लॉज वर गेलेल्या तरुणाचा मृत्यू! खिशात सापडल्या "स्टॅमिना" वाढवणाऱ्या गोळ्या..! तरुणांनो आता तरी डॉक्टरचं ऐका..!

 
नागपूर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): प्रेयसीसोबत लॉज वर रात्र घालविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.  नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे ही घटना घडली असून पोलिसांना मृतक तरुणाच्या खिशात व्हायग्रा या स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अजय परतेकी अस या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याची प्रेयसी २१ वर्षांची असून ती नर्स आहे. दोघेही लॉज वर गेले होते. तिथे तो अचानक बेशुद्ध झाला. यावेळी घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या मित्रांना फोन करून लॉज वर बोलावले मात्र तोपर्यंत अजयचा मृत्यू झाला होता. दोघांचे गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पुढच्या दोन महिन्यांनी दोघेही लग्न करणार होते मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याने अजयच्या प्रेयसीला प्रचंड धक्का बसला आहे .
 
खिशात सापडल्या स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.यावेळी अजयच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या. त्यामुळे अजयने लॉज वर गेल्यावर स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यानेच अजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या जाहिरातींना बळी पडू नका असे आवाहन वारंवार डॉक्टरांकडून करण्यात येते. मात्र अनेक तरुण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्ती वाढवणाऱ्या कोणत्याही गोळ्या व औषधे घेऊ नयेत . त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात . डॉक्टरांनी केलेल्या या सल्ल्याकडे तरुणांनी दुर्लक्ष करू नये एव्हढे मात्र नक्की..!