STATE NEWS भाजप नेत्याने विवाहितेची इज्जत लुटली! लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर घेतला उपभोग! २५ वर्षीय विवाहितेची तक्रार
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार नवीन सिंग याच्यासोबत त्याची २०२१ मध्ये फेसबुक वरून ओळख झाली. पतीसोबत वाद असल्याने विवाहिता तिच्या लहान मुलीसोबत वेगळी राहत होती. त्यावर तुला नोकरी देतो असे सांगून सिंग यांनी पीडित विवाहितेला एक खोली भाड्याने घेऊन दिली. आपल्याला नगरसेवक पदाची निवडणूक लढायची आहे त्यानंतर आपण लग्न करू असे आमिष सिंग याने तिला दाखवले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
सततच्या शारीरिक संबधामुळे पीडिता गर्भवती राहिली मात्र सिंग याच्या सांगण्यावरून तिने गर्भपात केला. त्यानंतर पिडीतेने सिंग याच्याकडे त्याने दिलेल्या शब्दानुसार लग्नाचा हट्ट धरला. मात्र सिंग याने लग्नाला नकार तर दिलाच याउलट पीडित विवाहितेचे खासगी फोटो परिचित व्यक्तीला पाठवून बदनामी केली. या प्रकारानंतर विश्वासघात झाल्याची जाणीव झाल्यानंतर तिने तडक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.