STATE NEWS ८ महिन्यांच्या चिमुकल्याने अचानक दूध पिणे सोडल! मेडिकल रिपोर्ट पाहून पालक अन् डॉक्टरही हादरले!

 
बारामती( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आईच दूध हे कोणत्याही बाळासाठी अतिशय महत्वाच असतं. मात्र जर हे दूधच पिण्याचे अचानक एखाद्या बाळाने सोडले असेल तर ती सामान्य गोष्ट नक्कीच नाही. त्यामुळे वेळीच बालरोग तज्ञ डॉक्टरचा घेतलेला बरा..बारामतीत एका ८ महिन्यांच्या चिमुकल्याने आईचे दूध पिणे अचानक सोडले. त्याला दवाखान्यात दाखल केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट मध्ये जे समोर आले ते पाहून चिमुकल्याचे पालकच नव्हे तर डॉक्टरही हादरले..!

लहान बाळामध्ये होणारे छोटे छोटे बदल सुद्धा पालकांनी काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत. एखाद्या वेळेस बाळाने दूध पिले नाही म्हणजे त्याचे पोट भरले असेल, त्याच्या पोटात गॅस झाला असेल असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण बारामतीत ८ वर्षाच्या चिमुकल्याने दूध सोडण्याचे जे कारण समोर आले आहे त्याचा पालकांनी विचारही केला नव्हता.

  या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याने अचानक दूध पिणे बंद केले. त्याच्या पालकांनी त्याला शहरातील बालरोगतज्ञ डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासण्या केल्या. एक्स रे काढल्यानंतर दूध न पिण्याचे धक्कादायक आणि हादरवून सोडणारे कारण समोर आले. 
   
 या बाळाच्या घशात जोडवे अडकल्याचे समोर आले. बाळ खेळत असताना त्याने त्याच्या आईचे जोडवे गिळले. मात्र ही बाब त्याच्या पालकांच्या लक्षात आली नाही. डॉक्टरांनी त्याला सर्जरी करण्यासाठी तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवलं. डॉक्टरांनी सर्जरी करून अलगद जोडवे बाहेर काढले. त्यानंतर सर्वांच्याच जीवात जीव आला. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.