हॉटेलमध्ये राहून गेलेल्या महिलेला पाठवला पोर्न व्हिडिओ; मॅनेजरचा प्रताप

 
पुणे ः काही दिवसांआधी हॉटेलमध्ये मुक्काम करून गेलेल्या महिलेला हॉटेल मॅनेजरने पोर्न व्हिडिओ पाठवला. पुण्याच्या महिलेसोबत हा प्रकार घडला. पीडितेने याप्रकरणी १४ मार्च रोजी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी हॉटेल मॅनेजरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिला काही दिवसांआधी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेली होती. श्रीनगरमधील हॉटेल श्रीकोट केस्टलमध्ये ती थांबली होती. हॉटेल मॅनेजर चमोली याने तिच्या मोबाइल नंबरची नोंद केली होती. त्यानंतर महिला परतल्यानंतर महिलेच्या व्हॉटस् ॲप नंबरवर मॅनेजरने पोर्न व्हिडिओ पाठवला. महिलेने लगेच सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल मॅनेजरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.