फेसबुकवरून ओळख अन् प्रेम... हॉटेलवर नेत जबरदस्ती शरीरसंबंध!; तोतया पोलिसाची करामत, २५ वर्षीय तरुणीची आपबिती
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी (२५) नागपुरातील रहिवासी आहे. फेसबुकवर तिची सोपानशी ओळख झाली. त्याची पोलीस दलात निवड झाली असून फक्त जाॅईन होणे बाकी आहे, असे तो तिला सांगत होता. फेसबुकवर दोघांचे प्रेम जुळले. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. लग्न करेन तर तुझ्याशीच, असे तो तिला म्हणाला.
जानेवारीत तो तिला भेटायला नागपुरात आला. त्याने तिला सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या वेळी त्याने तिचे न्यूड फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर तो ते न्यूड फोटो तिला दाखवून वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करू लागला. तिने विरोध केला असता त्याने ते न्यूड फोटो नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. संशय आल्याने तिने चौकशी केली असता तो पोलीस नसल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ती त्याला टाळू लागली. ती टाळत असल्याने सोपानने तिचे न्यूड फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवले. नातेवाइकांनी तरुणीला विचारणा केल्यावर ती हादरली. कुटुंबियांनी धीर दिल्याने अखेर ४ एप्रिलला तिने नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, ॲट्रॉसिटी, विनयभंग तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.