शिक्षणासाठी गेलेल्या मुलींचा भलताच कारनामा! २ लॉजवर पोलिसांचा छापा! डझनभर जोडप्यांना "ऑनलाईन" पकडले! मुली म्हणाल्या आम्ही तर! 

 
जळगाव(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): जळगाव शहरातील दोन लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी सुमारे डझनभर जोडप्यांना पोलिसांनी आक्षेपार्ह अवस्थेत "ऑनलाईन" पकडले. यामुळे संपूर्ण जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दलालांना सुद्धा ताब्यात घेतले आहे. मात्र या छापेमारीत ताब्यात घेतलेल्या मुलींनी आम्ही तर आमच्या मर्जीने इथे आलोय असे उत्तर पोलिसांना दिले आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी काल छापा मारला. यावेळी पोलिसांनी १३ जोडप्यांना पकडले. या लॉजवर अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने ही छापेमारी केली.
 या छाप्यात एका लॉजवर ३ मुले व ३ मुली व दुसऱ्या लॉज वरून ९ मुले व  ९ मुलींना पोलिसांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. या सर्व मुली महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या असून त्या शिक्षणानिमित जळगावात राहत असल्याचे कळते. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींपैकी काही मुली परप्रांतीय आहेत. दरम्यान आम्ही इथे आमच्या मर्जीने आलो होतो असे उत्तर मुलींनी दिले. मात्र पोलीस तपासात दलालांनी मुली पुरविल्याचे समोर आले आहे.