चार बारबाला गिऱ्हाईकांसोबत करत होत्या अश्लील हावभाव!; पोलिसांनी अचानक मारला छापा!!

 
मुंबई ः राज्‍यात डान्सबार बंद असले तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अजूनही ते सुरूच असल्याचे पोलीस कारवायांतून समोर येत असते. मुंबईतील दहिसर पूर्वच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील चिंचवाडीतील चिरंजिवी बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये काल, १५ जानेवारीला मध्यरात्री बाराच्या सुमारास चार बारबाला गिऱ्हाईकांसोबत येऊन बिभत्‍स हावभाव होत्या.

नृत्‍य करत त्‍यांच्याशी लगड करत होत्या. गिऱ्हाईक त्‍यांच्यापर पैसे उडवत होते. हॉटेलमधील वेटर मंडळी ते पैसे जमा करत होते... साध्या वेशातील पोलीस हे सर्व दृश्य मोबाइलमध्ये टिपून घेत होते. व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर पोलिसांनी खरे रूप प्रकट करत "पुलीस आयी रे बाबा...' म्‍हणत धरपकड सुरू केली आणि गिऱ्हाईक, बारबाला, वेटर, बार मॅनेजर सर्वांचीच पळापळ सुरू झाली... पण सापळाच असल्याने सारेच अडकले.

पोलिसांनी ३२ वर्षीय जसप्रित, २९ वर्षीय प्रियांका, ३२ वर्षीय शालूकमल, ३२ वर्षीय प्रियांका या बारबालांसह राजू यादव (रा. आंबेवाडी चाळ, मुंबई), जया सालियन (संतोषनगर, गोरेगाव, मुंबई), अंकुल सिंग (मीरा रोड पूर्व ठाणे), मानेविंद्रनाथ देसरकार (प्रगतीनगर, पूर्व ठाणे), अखिलेश मिश्रा (नालासोपारा पूर्व), सुरेश शेट्टी ( मीरा रोड पूर्व), श्रीनिवास गौडा (शंकर चाळ, बोरीवली पूर्व मुंबई), यशवंत शेट्टी (गजानन वाडी, मीरा रोड पूर्व ठाणे) या गिऱ्हाईकांना ताब्‍यात घेतले. बार कॅशियर विकास भुईया (दहिसर पूर्व, मुंबई), मालक सुरेश शेट्टी, मॅनेजर धर्मेश सिंग यांनाही ताब्‍यात घेण्यात आले.

बारबालांसह सकाळ होताच दहीसर पोलीस ठाण्यात हजर होण्याची सूचना करून त्‍यांना जाऊ देण्यात आले.  मॅनेजर, कॅशियर, दोन स्टूवर्ड, दोन वेटर, ८ गिऱ्हाइक यांना ताब्‍यात घेण्यात आले. दहीसर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक राजू चौधरी यांच्या तक्रारीवरून त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.