फेसबुक मैत्रिणीच्या डॉक्‍टर पडला प्रेमात... ती न्यूड झाली म्‍हणून तोही न्यूड झाला... मग ती आली "असलीयत'वर!

 
वर्धा : फेसबुकवरून डॉक्टर तिच्या प्रेमात पडला. दोघांत हाय, हॅलो... पासून तर व्हिडिओ कॉलवर बोलणे होऊ लागले. त्याचा विश्वास जिंकावा म्हणून ती न्यूड कॉल करू लागली. ते पाहून डॉक्टरही न्यूड झाला अन् तिने संधी साधली. डॉक्टरचा न्यूड व्हिडिओ सेव्ह करून तो व्हायरल करण्याची धमकी देत ती पैसे उकळू लागली. बदनामीच्या भीतीपोटी डॉक्टरने पैसे दिलेही. मात्र ती पुन्हा पुन्हा पैसे मागत होती. डॉक्टरची तिजोरी रिकामी व्हायची वेळ आल्याने डॉक्टरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलिसांनी पैसे उकळणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सावंगी परिसरातील एका मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरची फेसबुकवरून तरुणीशी ओळख झाली होती. दोघांचे व्हिडिओ कॉलवर बोलणे व्हायचे. दरम्यान डॉक्टरचा विश्वास जिंकण्यासाठी ती डॉक्टरला न्यूड व्हिडिओ कॉल करायची. समोरचे दृश्य पाहून डॉक्टरही तिच्यासमोर न्यूड व्हायचा.

तिने डॉक्टरचा न्यूड व्हिडिओ डॉक्टरला पाठवला व व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर पैसे मागितले. डॉक्टरने बदनामीच्या भीतीपोटी ६० हजार रुपये पाठविले. मात्र त्यानंतर तरुणीची मागणी सुरूच होती. डॉक्टरने पुन्हा २ लाख ६५ हजार रुपये पाठवले. तिने डॉक्टरकडून ३ लाख २५ हजार ५४० रुपये वसूल केले. ती सतत पैसे मागत होती. अखेर डॉक्टरने सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.