भोकरदन हादरले! लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या तरुणीला उचलून नेऊन केला लैंगिक अत्याचार!!
Updated: Mar 30, 2022, 10:00 IST
जालना : लघुशंकेसाठी रात्री घराबाहेर गेलेल्या तरुणीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात समाधान पालोदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी गावातील १८ वर्षीय तरुणी २७ मार्चच्या रात्री लघुशंकेसाठी घरामागे गेली होती. त्यावेळी समाधान पालोदे या तरुणाने तिला उचलून काही अंतरावर अंधारात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने आरडाओरड केल्याने तिची आई आणि भाऊ तिथे धावत आले. त्यांनी समाधानला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरारी झाला. त्यानंतर तरुणीने नातेवाइकांसह हसनाबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी समाधानविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आज, 30 मार्चपर्यंतही तो मिळून आला नाही.