रूमचा दरवाजा उघडताच दिसून आली अर्धनग्न महिला अन्‌ "तो'!; पुण्यात बोकाळलाय स्पा सेंटरच्याआड वेश्या व्यवसाय, गिऱ्हाईकाकडून घेतात ३ हजार अन्‌ तरुणींच्या हाती टेकवतात अवघे ५०० !

 
पिंपरी चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा धंदा पुणे आणि परिसरात अक्षरशः बोकाळला आहे. परिस्थितीने गरीब; परंतु दिसायला बऱ्या असलेल्या मुलींना मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात ओढले जात आहे. त्यांना नोकरीचे आमिष दाखवत स्पा सेंटरवर मसाज करून देण्याची नोकरी द्यायची. प्रत्यक्षात मात्र तिथे येणाऱ्या उच्चभ्रू लोकांची वासना भागविण्यासाठी त्या मुलींचा उपयोग करायचा. मुलींच्या हतबलतेचा फायदा घ्यायचा. ग्राहकाकडून ३००० रुपये घ्यायचे आणि मुलींच्या हातावर केवळ ५०० रुपये टेकवायचे, असा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. १ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवडमधील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पोलिसांनी ४ मुलींची या व्यवसायातून सुटका करून स्पा सेंटरच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा  दाखल करून त्याला अटक केली.

पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई सागर प्लाझा या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. तिथे स्पा सेंटरच्या नावाखाली अवैधरीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाला स्पा सेंटरवरमध्ये पाठवले. वेश्या व्यवसाय होत असल्याची खात्री होताच बनावट ग्राहकाने बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाला मिस कॉल केला. पथकाने स्पा सेंटरवर छापा मारला. स्पा सेंटर मॅनेजरची चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांनी पाठवलेला ग्राहक एका ३४ वर्षीय महिलेसोबत एका खोलीत पाठविल्याचे सांगितले.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा वाजवताच दरवाजा उघडला गेला. आत पोलिसांना अर्धनग्न महिला आणि बनावट ग्राहक दिसून आला. पोलिसांना खोलीत कंडोम मिळून आले. स्पा मॅनेजर आलीम उद्दिन हा त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्यावसाय करून घेत असल्याने महिलेने पोलिसांना सांगितले. स्पामालक एका ग्राहकाचे ३ हजार रुपये घेतो आणि मुलीला त्यातील केवळ ५०० रुपयेच देतो, असे तिने पोलिसांना सांगितले. स्पा सेंटरमध्ये स्पा मॅनेजरने ४ मुली दाखवल्या होत्या. पैकी एका एकीची निवड करायला सांगितली, असे बनावट ग्राहकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मॅनेजरच्या ताब्यातून दोन मोबाइल, कंडोम, रोख  सहा हजार दोनशे रुपये असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी स्पा मॅनेजर आलीम उद्दीन अब्दुल समद(२५), स्पा मालक महिला सीमा दीपक धोत्रे (३५, रा शिवाजीनगर पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.