घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा १६ वर्षीय विद्यार्थ्याने काढला बाथरूम व्हिडिओ!; मोबाइल लपून ठेवला होता...

 
पुणे : इंग्रजीचा अभ्यास घेण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्याने बाथरूममध्ये मोबाइल लपवून व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. पुण्यातील कर्वेनगर भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याचे वय केवळ १६ वर्षे असून, शिक्षिका ५६ वर्षांची आहे. शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांपासून शिक्षिका नियमितपणे कर्वेनगर भागातील एका विद्यार्थ्याची शिकवणी घेण्यासाठी त्याच्या घरी जात होत्या. विद्यार्थी यंदा दहावीला होता. काही दिवसांआधी शिक्षिका मुलाच्या घरातील वॉशरूममध्ये गेल्या होत्या. मात्र त्या जाण्यापूर्वी मुलाने आत मोबाइल लपवून ठेवत व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले होते. त्यामुळे शिक्षिकेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. त्याआधी विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या छातीचासुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

गेल्या काही दिवसांपासून त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. शिकवणी सुरू असताना तो वारंवार हातात मोबाइल घेत होता. मोबाइल कशासाठी घेतो असे विचारून शिक्षिका त्याच्याकडील मोबाइल घेऊ लागल्या तेव्हा तो गोंधळून गेल्याने त्यांचा संशय वाढला. मोबाइल तपासल्यावर शिक्षिकेला त्यांचेच व्हिडिओ दिसून आले. त्यानंतर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात शिक्षिकेने तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.