२४ तासांत आढळले दुसरे नवजात अर्भक!; मरणासाठी टाकून दिले, पण देवाने तारले!, मलकापूरमधील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोदमध्ये नवजात अर्भक आढळून २४ तास उलटत नाही तोच आज, २९ ऑगस्टला सकाळी सातच्या सुमारास मलकापूरमध्ये तसाच प्रकार समोर आला आहे. धारिवाल अँड छोरीया पाण्याच्या टाकीजवळ नवजात अर्भक आढळले आहे. याच भागातील रहिवासी सुरेश नामदेव उमाळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता. या बाळाला कुणीतरी …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोदमध्ये नवजात अर्भक आढळून २४ तास उलटत नाही तोच आज, २९ ऑगस्‍टला सकाळी सातच्‍या सुमारास मलकापूरमध्ये तसाच प्रकार समोर आला आहे. धारिवाल अँड छोरीया पाण्याच्या टाकीजवळ नवजात अर्भक आढळले आहे. याच भागातील रहिवासी सुरेश नामदेव उमाळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता बाळाच्‍या रडण्याचा आवाज आला होता.

या बाळाला कुणीतरी रात्रीच्या सुमारास एका बांधलेल्या सिमेंटच्या चौकटीत टाकून दिले. पण “देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्‍यय सर्वांना आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक रतनसिंह बोराडे, पोहेकाँ आनंद माने, पत्रकार बाळासाहेब जगताप, नारायण पानसरे, गणेश तायडे, गजानन ठोसर, विजयकुमार वर्मा, दीपक ईटनारे, मुन्ना पानसरे यांनी घटनास्थळी आले व बाळाला उपजिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्‍याच्‍यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बाळाला बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. ठाकरे करत आहेत.