‘स्वच्छ शेगाव’साठी धाव धाव धावले..! रोटरी क्लब अन् नगरपालिकेतर्फे मॅरेथॉन
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकाेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वच्छ शेगाव निमित्त रोटरी क्लब आणि शेगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी रोजी तीन प्रकारात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शकुंतला बुच यांच्या हस्ते झाले. तीन किलोमीटर, सात किलोमीटर आणि अकरा किलोमीटर अशा तीन गटांत पुरुष व महिलांमध्ये स्पर्धा झाली. यात विजेत्यांना बक्षिसे वाटप …
Feb 15, 2021, 15:14 IST
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकाेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वच्छ शेगाव निमित्त रोटरी क्लब आणि शेगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी रोजी तीन प्रकारात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शकुंतला बुच यांच्या हस्ते झाले. तीन किलोमीटर, सात किलोमीटर आणि अकरा किलोमीटर अशा तीन गटांत पुरुष व महिलांमध्ये स्पर्धा झाली. यात विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. शेगाव-खामगाव रोडवरील स्व. गजानन दादा पाटील मार्केट याॅर्ड येथून मॅरेथान स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब शेगावचे सर्व पदाधिकारी , सदस्य, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, पालिका गटनेते शरद अग्रवाल यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.