सहा गायी निर्दयीपणे टेंपोत कोंबून चालवल्या होत्या!; सतर्क युवकांमुळे वाहन पकडले, कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय, मलकापूरची घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सात गायी निर्दयीपणे कोंबून नेल्या जात असताना सतर्क युवकांनी संशयावरून टेंपो पकडला. विचारणा केली असता वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे युवकांनी ताडपत्री खोलून पाहिली, तेव्हा लहानमोठ्या गायी आणि एक गोऱ्हा दिसून आला. शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त करून गायींना बेराड येथील श्रीहरी गोशाळेत सोडले आहे. …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सात गायी निर्दयीपणे कोंबून नेल्या जात असताना सतर्क युवकांनी संशयावरून टेंपो पकडला. विचारणा केली असता वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यामुळे युवकांनी ताडपत्री खोलून पाहिली, तेव्हा लहानमोठ्या गायी आणि एक गोऱ्हा दिसून आला. शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्‍यानंतर पोलिसांनी वाहन जप्‍त करून गायींना बेराड येथील श्रीहरी गोशाळेत सोडले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्‍यांच्‍या ताब्‍यातून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई आज, २४ सप्‍टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास मलकापूर येथील वानखेडे पेट्रोलपंपानजिक करण्यात आली.

मोताळ्याकडून हा टेंपो मलकापूरकडे येत होता. संशय आल्याने रितेश दहीभाते, मयूर मंडवाले, प्रविण वानखेडे, राजू मंडवाले यांनी तो पकडला. शहर पोलिसांना कळवले जाताच एपीआय सुखदेव भोरकडे यांच्‍यासह पोलीस अंमलदार ईश्वर वाघ, संतोष कुमावत, सलीम बर्डे, गोपाल तारुळर, अनिल डागोर, दुर्गासिंग सोळुंके यांनी घटनास्‍थळी येऊन वाहन जप्‍त केले. वाहनमालक मंगल नथ्थू तायडे (रा. घुस्सर ता. मोताळा), ख्वाजा शरीफ उद्दीन ख्वाजा पुरी (रा. हिंगणा काझी ता. मलकापूर) या दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करून अटक करण्यात आली. सहा गायी व एक गोरा (एकूण किंमत ३५ हजार रुपये) व वाहन (किंमत ९० हजार रुपये) असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक स्मिता म्हसाये, रायटर मंगेश चरखे करत आहेत.